Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi

Directions

Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi, Labor & Employment Lawyer, Pune.

✊ जिथे कामगार, तिथे संघटन!
आमचे कार्य:
🔹 कामगारांना किमान वेतन, PF, ESIC व इतर कायदेशीर हक्क मिळवून देणे
🔹 ठेकेदार व कंपन्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात संघर्ष
🔹 कामगारांना कायदेशीर मार्गदर्शन व सहाय्य
🔹 संघटनबांधणी करून कामगारांना एकत्र आणणे

आम आदमी पार्टी, महाराष्ट्रराज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरपक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीती आखण्यासाठी प्रदेश...
29/09/2026

आम आदमी पार्टी, महाराष्ट्र
राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिर
पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीती आखण्यासाठी प्रदेश प्रभारी प्रकाशजी जारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हाध्यक्ष, महानगरपालिका शहराध्यक्ष व राज्यस्तरीय पदाधिकारी यांचे २ दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष आकर्षण:
दिल्ली सरकारच्या 'डायलॉग अँड डेव्हलपमेंट कमिशन'चे माजी प्रमुख जास्मिन शहा लिखित 'केजरीवाल मॉडेल' या मराठी पुस्तकाचे प्रकाशन व त्यांचे विशेष मार्गदर्शन.

तारीख: २ व ३ ऑक्टोबर २०२६

-दिवस १ (२ ऑक्टोबर): सकाळी १०:०० ते रात्री ८:००
-दिवस २ (३ ऑक्टोबर): सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००

स्थळ: भारत इतिहास संशोधक मंडळ (भरत नाट्य मंदिर शेजारी), १३२१, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे.
गुगल मॅप लिंक:
https://maps.app.goo.gl/7gwmojEGJ7fnq1s96

16/09/2026
🌹 मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! 🌹आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सहसचिव या महत्त्वपूर्ण पदावर श्री....
16/09/2026

🌹 मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा! 🌹

आम आदमी पार्टी, महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश सहसचिव या महत्त्वपूर्ण पदावर श्री. किरणजी कद्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

आपल्या संघटन कौशल्याचा, कार्यक्षमतेचा आणि जनहितासाठीच्या कार्याचा पक्षाच्या पुढील वाटचालीस निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.

आपल्या या नवीन जबाबदारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक सक्षम आणि मजबूत होवो, हीच सदिच्छा. ✊🇮🇳

हार्दिक अभिनंदन किरणजी! 💐💐

#आमआदमीपार्टी #किरणजीकद्रे #प्रदेशसहसचिव #हार्दिकअभिनंदन #संघटन #जनहित #महाराष्ट्र

The Aam Aadmi Party hereby announces the appointment of State Social Media Coordinators.All team Congratulations Namdeo ...
13/09/2026

The Aam Aadmi Party hereby announces the appointment of State Social Media Coordinators.

All team Congratulations

Namdeo Bhagile Patil congratulations

भाजपाच्या लाखो कट कारस्थानांना पुरून उरले, पण झुकले नाहीत- त्यांचे नाव आहे सत्येंद्र जैन!
03/09/2026

भाजपाच्या लाखो कट कारस्थानांना पुरून उरले, पण झुकले नाहीत- त्यांचे नाव आहे सत्येंद्र जैन!

प्रेस नोटदिनांक : 03/09/2026पुण्यात चाललंय तरी काय? कुठे मुस्कटदाबी तर कुठे मारहाण !संतोष पंडित यांच्या अटकेचा आम आदमी प...
03/09/2026

प्रेस नोट

दिनांक : 03/09/2026

पुण्यात चाललंय तरी काय? कुठे मुस्कटदाबी तर कुठे मारहाण !

संतोष पंडित यांच्या अटकेचा आम आदमी पार्टीकडून तीव्र निषेध !
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारल्याची ही शिक्षा आहे का?
चंद्रकांत पाटील हे पुण्याचे व्हाइसरॉय आहेत का ?
विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध !

सामाजिक आणि नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे तसेच सत्ताधाऱ्यांना आपल्या Instagram Reelsच्या माध्यमातून थेट आणि कठीण प्रश्न विचारणारे संतोष पंडित यांच्या अटकेचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे. संतोष पंडित यांनी गेल्या काही काळात रस्ते, सार्वजनिक सुविधा, प्रशासनातील अनियमितता आणि जनतेच्या पैशांच्या वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सत्तेत असलेल्या व्यक्तींना थेट प्रश्न विचारणे हा लोकशाहीतील नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, अशा प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी किरकोळ स्वरूपाच्या आरोपांवरून संतोष पंडित यांना अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ज्यांच्या बद्दल संतोष पंडित यांनी विधाने केली आहेत, त्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील व नगरसेविका मिताली ताई साळवेकर यांची तक्रार मुळीच नाही. त्यामुळे कोथरूड पोलिस स्टेशनने दाखल केलेले गुन्हे हे राजकीय दबावापोटी आकसाने हेतू पुरस्सर त्रयस्थ व्यक्ती करवी दाखल केले आहेत, असे दिसते. विशेषतः अटकेची रात्री १:३० ची वेळ आणि पद्धतीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रात्री उशिरा कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या अटकेची कायदेशीरता संशयास्पद आहे. या तक्रारीत उल्लेख केलेले तथाकथित आक्षेपार्ह शब्द हे बोली भाषेत अनेकदा वापरले जातात. या शब्दांची निवड योग्य आहे का हा वेगळा मुद्दा असला तरी केवळ त्यावरून गुन्हा दाखल करुन अटक करणे म्हणजे पुण्याला हुकुमशाहीकडे नेणे होय. हा सत्तेचा गैरवापर आहे.

नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून झालेल्या काही कामांबद्दल प्रश्न उपस्थित केले तर त्यांच्या प्रभागासाठीचा निधी शून्य केला गेला. संतोष पंडित यांनी ओपन जिमच्या कामातील दुपटीने फुगवलेले बजेट व आर्थिक अनियमितता याबद्दल बोलले तर त्यांच्या वर गुन्हा दाखल होऊन अटक केली. माननीय चंद्रकांत दादा पाटील हे लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत, पुण्याचे व्हाइसरॉय नाहीत. त्यामुळे त्यांनी निर्वाचित लोकप्रतिनिधी म्हणून आणि जबाबदार मंत्री म्हणून राजकीय टीका सहन करण्याची सवय करून घ्यावी. राजकीय टीकेला राजकीय प्रत्युत्तर द्यावे. यंत्रणांचा दुरुपयोग करून प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

तसेच वाढीव आवाजातील डीजे विरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर आज झालेल्या मारहाणीचा आम आदमी पार्टी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करत आहे. पुण्यात कायद्याच्या राज्यापेक्षा झुंडशाही फोफावत चालली आहे. सुसंस्कृत पुणे शहरासाठी ही खेदाची बाब आहे. लोकशाहीत सगळ्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. पण सध्या मुद्द्यांऐवजी गुद्द्यांची लढाई वाढत चालली आहे.

कळावे,

Abhijit More (प्रदेश सचिव), Amit Mhaske (प्रदेश समन्वयक), Sanjay Kone (प्रदेश संघटक- कामगार आघाडी), आरती करंजावणे Aarti Karanjawane (महिला आघाडी शहर अध्यक्षा), Sunita Kale (माजी शहर अध्यक्षा), Madhuri Matth, Sunil Sawadi, Nitin Kute Patil (कार्याध्यक्ष - कामगार आघाडी)

08/08/2026

बघा व शांत बसा...

08/08/2026

56 टक्के कमिशन सरकारच्या रस्ते-पूल बांधकामांची पोलखोल उघड होत आहे!
राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेला कोठी–कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांतच पुरामुळे खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

https://ebx.sh/NSGJq6

🚨 STOP E20 पेट्रोल? चला... जाणून घेऊया वस्तुस्थिती!इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल हे खरंच पर्यावरणासाठी फायदेशीर आहे का?वाहन...
08/08/2026

🚨 STOP E20 पेट्रोल? चला... जाणून घेऊया वस्तुस्थिती!

इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल हे खरंच पर्यावरणासाठी फायदेशीर आहे का?
वाहनांच्या इंजिनवर त्याचा काय परिणाम होतो?
मायलेज, देखभाल खर्च, ग्राहक, शेतकरी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे नेमके परिणाम काय आहेत?

याच विषयावर नागरिकांसाठी टाऊन हॉल चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

📅 दिनांक: १४ ऑगस्ट २०२६ (शुक्रवार)
🕛 वेळ: दुपारी १२.०० ते ३.००
📍 स्थळ: पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे – ४११००५

🎤 या चर्चासत्रात तज्ज्ञ, अभ्यासक आणि नागरिक सहभागी होऊन विविध मतांचा विचार मांडतील.
हा कोणत्याही निष्कर्षाचा कार्यक्रम नसून तथ्यांवर आधारित सार्वजनिक संवाद आणि जनजागृतीचा प्रयत्न आहे.

✅ आपणही सहभागी व्हा.
✅ प्रश्न विचारा.
✅ आपले मत मांडा.
✅ माहितीपूर्ण निर्णयासाठी चर्चेत सहभागी व्हा.

लोकशाहीत संवाद हीच खरी ताकद आहे!

#इथेनॉल ेट्रोल #टाऊनहॉल #चर्चासत्र #पुणे #जनजागृती #नागरिकांचा_आवाज

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aam Aadmi Party Maharashtra - Kamgar Aghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share