26/06/2026
कामगारांचे प्रेम आणि द्वार सभा..
आज तुर्भे येथील रेल्वे कंटेनर यार्ड मधील कामगारांनी द्वारसभे सोबत स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी यार्ड मधील कामगार, सुरक्षा रक्षक व सर्वेअर यांच्या सोबत मीटिंग करून त्यांच्या कामातील अडचणी. यार्डमधील अडचणी , पगार वाढ व पगार वेळेवर न मिळणे अश्या अनेक समस्या जाणून घेऊन. लवकरच सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे त्यांना आश्वासन दिले.
यावेळी कामगारांनी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कामगारांसोबत भोजन, गप्पा मारत असताना त्यांच्या अडचणी तसेच सुखदुःख जाणून घेतल्या. खूप छान वाटले.
सर्व आयोजन आमचे अभय भिसे, अबिद अली , महादेव यमगर, गणेश भिसे व सर्व कामगारांनी केले होते, सर्वांचे मनापासून आभार.
यावेळी सर्व कामगारांनी मला विठ्ठल रुक्मीणी मूर्ती देऊन सन्मान केला...
यावेळी. अश्विन गोळे, संजय खंडाळे, नंदकुमार कोठावळे, कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते..
धन्यवाद..
आपला,
बाळासाहेब शिंदे,
सरचिटणीस,
महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना.
मो. न. 9819749222.
#कामगार #रेल्वे #कोनकर