मोहटा ग्राम प्रतिष्ठान - Mohata Gram Pratishthan

  • Home
  • India
  • Pathardi
  • मोहटा ग्राम प्रतिष्ठान - Mohata Gram Pratishthan

मोहटा ग्राम प्रतिष्ठान - Mohata Gram Pratishthan its a charitable trust ......providing help for villager's, n other pople संस्था नव्हे "आस्था"
सामाजिक ,सांस्कृतिक , अध्यात्मिक ,शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारी

वैराग्य मूर्ती श्री संत भगवान बाबा दर्शन दि.12.2.2024
12/02/2024

वैराग्य मूर्ती श्री संत भगवान बाबा दर्शन दि.12.2.2024

इतकं अफाट आणि निस्वार्थ प्रेम शतकात एखाद्याच व्यक्तीच्या वाट्याला येत. आपल्या रोजच्या आयुष्यासाठी संघर्ष करणारी माणसे सु...
12/12/2023

इतकं अफाट आणि निस्वार्थ प्रेम शतकात एखाद्याच व्यक्तीच्या वाट्याला येत. आपल्या रोजच्या आयुष्यासाठी संघर्ष करणारी माणसे सुद्धा या माणसासाठी आपली बैलगाडी रथ समजून आहे तिथं, आहे त्या स्थितीत अभिवादन करत असतील तर नक्कीच तो देवमाणूस असावा.
मीच काय, माझ्यासारखी असंख्य बहुजन समाजातली माणसं या व्यक्तिमत्वाने स्वाभिमानाने उभा केली आहेत. गावगाड्यातील वंचित, उपेक्षित माणसांना नवी ओळख साहेबांनी करून दिली. आज साहेबांची जयंती निमित्त साहेबांना विनम्र अभिवादन...!

🙏🙏

Application Form for Pre-Police Recruitment Training‘महाज्योती’ या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेल्या इतर ...
09/12/2020

Application Form for Pre-Police Recruitment Training
‘महाज्योती’ या संस्थेद्वारे महाराष्ट्र राज्याचा अधिवास असलेल्या इतर मागासवर्ग,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच धनगर या समाज घटकातील पात्र युवक युवतींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना.
https://mahajyoti.org.in/registration/police/step1.php?msg=0
नॉनक्रिमीलेअर उत्पन्न गटातील बारावी ऊतीर्ण इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. परिपुर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ डिसेंबर २०२०..
ही माहिती सर्व गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा, आपल्या मार्गदर्शनामुळे कदाचित एखादा युवक पोलीस बनु शकेल.
#महाज्योती #पोलीसभरती

12/12/2018

आपल्या शेतकरी वर्गाच्या मागणी अन् दशा..

जाहीर बैठकपानीदार मोहटे - कामाची पुढील दिशा ठरविणेसाठी  व समन्वय समिती तयार करण्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे. जास्तीत ज...
12/11/2018

जाहीर बैठक
पानीदार मोहटे - कामाची पुढील दिशा ठरविणेसाठी व समन्वय समिती तयार करण्यासाठी बैठक आयोजित केलेली आहे. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
दि.१२/११/२०१८ ,सोमवार
वेळ:-सायंकाळी ७.०० वा.
ठिकाण:-हनुमान मंदिर, मोहटे, ता-पाथर्डी

ै_तो_कल_है..!

08/11/2018
06/11/2018

 #सत्यमेव_जयते_वॉटर_कप_स्पर्धा_2019अहमदनगर जिल्ह्यातील पहिली ग्रामसभा मौजे मोहटे, ता.पाथर्डी गावात हनुमान मंदिरात नारळ व...
04/11/2018

#सत्यमेव_जयते_वॉटर_कप_स्पर्धा_2019
अहमदनगर जिल्ह्यातील पहिली ग्रामसभा मौजे मोहटे, ता.पाथर्डी गावात हनुमान मंदिरात नारळ वाढवून आज रात्री 7.30 ते 9.30 या दरम्यान संपन्न झाली.
#मोहटे गावामध्ये पावसाचे वातावरण असताना सुध्दा मा. #सरपंच आसाराम दहिफळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ हजर होते. महादेव दहिफळे यांनी प्रास्ताविक केले.
प्रा.संतोष दहिफळे समन्वयक पानी फाऊंडेशन यांनी म.ग्रा.रो.ह.योजना, जलसंधारण,पाणलोट-उपचार, जलसंधारणाबाबत सविस्तर माहिती सांगितली.लोकांच्या शंका/प्रश्न ऐकुन सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्वतः ११,१११ रु लोकवर्गणी देवुन कामासाठी लोकवर्गणीचे आवाहन केले.आवाहन ऐकताच ११ लोकांनी जागेवरच प्रत्येकी ११,१११ रुपये जमा केले. अशा प्रकारे पहिल्या बैठकीत #१२२२२१ रुपये (एक लक्ष ,बावीस हजार, दोनशे, एक ) रुपये लोकवर्गणी जमा झाली. चावडीत झालेल्या बैठकीत अविनाश फुंदे, रामदास दहिफळे, विक्रम दहिफळे, अमृत चोपडा यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी झालेल्या चर्चेत बाबासाहेब दहिफळे, रामकिसन फुंदे, भगवानराव दहिफळे, शिवाजी दहिफळे, दत्तात्रय दहिफळे, संदिप पालवे, भिमराव दहिफळे, पांडुरंग फुंदे, पांडुरंग दहिफळे, राजुबाबा गोसावी, देविदास दहिफळे, जालिंदर आव्हाड, मारुती दहिफळे, ईश्वर दहिफळे, श्रीधर दहिफळे तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सहभाग घेतला. आभार महादेव दहिफळे यांनी मानले.
#तुफानआलंया #जलयुक्तमोहटे

💧💧💧  #जलमंदिर💧💧💧आत्मिय ग्रामजनहो, सस्नेह नमस्कार.आज राज्यातील 180 तालुक्यात दुष्काळ पडलेला आहे. पाथर्डी तालुक्याची राज्य...
27/10/2018

💧💧💧 #जलमंदिर💧💧💧

आत्मिय ग्रामजनहो, सस्नेह नमस्कार.
आज राज्यातील 180 तालुक्यात दुष्काळ पडलेला आहे. पाथर्डी तालुक्याची राज्यातील गंभीर दुष्काळी तालुका म्हणून सरकारकडे नोंद झालेली आहे.आपल्या गावाला गंभीर दुष्काळी गाव म्हणून दोन दिवसापूर्वीच जलसंधारण मंत्री यांनी भेट देवुन पाहणी केलेली आहे. आपल्या परिसरात कोणत्याही विहीरीत पाणी शिल्लक नाही. दोन महिण्यापासून टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. अन्नधान्याची अडचण कोणालाही येणार नाही. परंतू भविष्यात टँकरने मिळणारे पाणी मिळेलच याची कोणालाही कोणतीच खात्री नाही. कारण टँकर भरण्यासाठी पैठण सोडता कुठेही पाणी नाही. आज पासुन पावसाळा आठ महिने लांब आहे.
#दिवसा सुर्यप्रकाशात डोळ्यासमोर काजवे चमकावे अशी स्थिती निर्माण झालेली आहे.भविष्यात परिस्थिती आणखीनच गंभिर होऊन पाण्यासाठी अनेक गावे पाण्याच्या परिसरात स्थलांतरीत होणार आहेत......????

मित्रांनो दुर्दैवाने आलेला दुष्काळ एक सुवर्णसंधी आहे असे समजुन आपण सर्वानी डोळे उघडून याकडे गांभिर्याने पाहुया......

भविष्यात पावसाची अनियमितता झाली,पाऊस कमी पडला तरी आपल्याला टँकर लागणार नाही.यासाठी आपण सर्वानी एकत्र येवुन दुष्काळात स्वतः झोकुन देवुनजलसंधारण, मृदासंधारण, एकत्र श्रमदान करुन मनसंधारण करुन आपल्या मायभुमीला समृद्ध करुया !

काय पटलं का राव....???

पटलं तर या बैठकीला.🙏🙏

लागुया दुष्काळापासुन मुक्ती च्या तयारीला.
आम्हाला खात्री आहे आपण नक्कीच याल.
चला जलमंदिर उभारणीच्या कामात हिरीरेने सहभागी होऊ यात...!!

दिनांक:-3/11/2018
वेळ:-सायंकाळी 6.30 वा.
स्थळ:-हनुमान मंदिरासमोर, मोहटे

🎯🎯🎯🎯🎯🎯
Santosh D. Dahifale Mahadev Dahifale Vishnu Dahifale Bhau Dahifale Mahadev Dahifale Chetankumar Funde Sandip Dahifale

राष्ट्रसंत भगवानबाबांच्या चरणी शतश: नमन..!! #मानवता_हाच_धर्म आहे, जो दुसऱ्या व्यक्तींचे दुःख जाणून घेत नाही, त्याची प्रग...
31/08/2018

राष्ट्रसंत भगवानबाबांच्या चरणी शतश: नमन..!!
#मानवता_हाच_धर्म आहे, जो दुसऱ्या व्यक्तींचे दुःख जाणून घेत नाही, त्याची प्रगती होत नाही. मनुष्य देह हा काही पुन्हा पुन्हा मिळणारी गोष्ट नाही, तेव्हा उभा जन्माचे सार्थक झाले पाहिजे. लोभीपणाने वागू नका.अति इच्छेमुळेच सर्व दुःखाची उत्पत्ती होते. समाधानाने जगायचे शिका. परोपकाराने पुण्य लाभते. परपिडणाने पाप लागते. तेव्हा परोपकार करा, नेहमी मुखी 'राम नाम' घ्या. रामनामामध्ये एवढी शक्ती आहे की, ते घेतल्याने आपला देह पवित्र होतो. जे काही पापचरण घडले असेल ते नाहीसे होते. गळ्यात तुळशीची माळ घाला, अभक्ष्य भक्षण करू नका, मुक्या प्राण्यांवर दया करा, भुकेल्याची भूक, तहानलेल्याची तहान जाणून घ्या, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका, सर्व प्राणिमात्रांवर दया करा, देव त्यांच्यात आहे, आपापसांत भांडू नका, त्यामुळे तुमचीही प्रसन्नता तुम्ही गमावून बसता. आई वडिलांना जपा देवावर श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धेला मूठमाती द्या. कुणाचाही द्वेष करू नका.
जातीपातीच्या बंधनात अडकून राहू नका, मुलांना शिकवा, त्यांना अडाणी ठेवू नका...'
- #गुरुवर्य_भगवानबाबा

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत  #श्रीमंतयोगी #छत्रपती_शिवाजी_महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना वंदन व मानाचा  #मुजरा....
19/02/2018

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत #श्रीमंतयोगी
#छत्रपती_शिवाजी_महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांना वंदन व मानाचा #मुजरा....🙏🙏
समस्त शिवप्रेमी जनतेला हार्दिक शुभेच्छा...!!!

🚩जय भवानी जय शिवराय🚩

Address

Mohate
Pathardi
414102

Alerts

Be the first to know and let us send you an email when मोहटा ग्राम प्रतिष्ठान - Mohata Gram Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मोहटा ग्राम प्रतिष्ठान - Mohata Gram Pratishthan:

Share