Ujani Agro Farm Producer Co. Ltd.

Ujani Agro Farm Producer Co. Ltd. Product by JD Jagtap Group


Produce TO Export and Export Product is Excellent Quality

04/11/2020

मिटींग
दि 5.11.2020
सकाळी 10:00 वाजता
स्थळ : प्रशासन भवन इंदापूर
विषय : Grow Build FPO Strategy

Send a message to learn more

02/09/2018

*ऊस पिकातील हुमणी आळीचे नियंत्रण करणे गरजेचे*
*यावर्षीच्या उन्हाळ्यातील तपमान जास्त असल्यामुळे व आपल्या जुन्नर तालुक्यात अद्याप ही पुरेसा पाऊस न झाल्याने ऊस पिकात हुमणी अळीचे भुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.प्रौढ भुंगे ऊस पिकात व रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात अंडी घालून हुमणी अळीची निर्मिती होत आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियंत्रणाचे उपाय करून अळीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे.जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जन्मलेली अळी ऊस व इतर संवर्ग पिके खाऊन एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नुकसान करते.झालेल्या नुकसानीचे गांभीर्य ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्याच्या लक्षात येते.तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते.अशा वेळी हुमणी अळीचे नियंत्रण करणे अतिशय अवघड होते.म्हणून हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्या अधीच जून महिन्यातच हुमणी अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.*
*हुमणी अळीचे जीवन चक्र*
-----------------------------------
अंडी,अळी, कोष व पतंग या आवस्थांमधून हुमणी किडीचे जीवन चक्र पूर्ण होते.
1) *भुंगेरे*:-- भुंगेरे निशाचर असतात.होलोट्रॅक
ीयाचे भुंगे गडद विटकरी रंगाचे असतात.त्यांची लांबी 2.5 सेंमी व रुंदी 1 सेंमी असते.पंख जाड व टणक असतात.पाय तांबूस रंगाचे असतात.नर व मादी या दोन्ही मध्ये मिशा असतात.नर भुंग्यात मिशीची गाठ मोठी असते व उडतांना घुं s s असा आवाज येतो.पहिल्या वळीवाच्या पावसा नंतर सायंकाळी भुंगे जमिनीतून बाहेर येतात आणि नर मादीचे मिलन होते.त्यानंतर ही भुंगे कडुनिंब ,बाभळी किंवा शेताभोवती असणाऱ्या झाडा झुडपावर जाऊन बसतात.पुन्हा सूर्योदयापूर्वी जमिनीत घुसून बसतात.
*2)अंडी*:-- जमिनीत 4 इंच खोलीवर मादी अंडी घालते. दररोज एक या प्रमाणे 60 दिवस अंडी घालते.अंडे ज्वारी किंवा मटकीच्या आकाराचे असतात.सुरुवातीला पांढरे नंतर तांबूस गोलाकार होतात.त्यांची लांबी 3.65 मिमी व रुंदी 2.15 मिमी असते.अंड्यातून 10 ते 15 दिवसानी अळी बाहेर पडते.
3) *अळी*:-- पावसाळ्याच्या सुरुवातीला घालायला सुरुवात होते.अंड्यातून बाहेर आलेली अळी पांढरट असते.अळीच्या 3 अवस्था असतात.पहिली अवस्था 25 ते 30 दिवस,दुसरी अवस्था 30 ते 45 दिवस आणि तिसरी अवस्था 140 ते 145 दिवसाची असते.पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी 45 ते 65 मिमी लांब,12 मिमी जाडीची असून इंग्रजी C आकाराची असते.रंग पिवळसर पांढरा असतो ,जबडा मजबूत असतो, डोळे तांबूस ते गडद तांबूस असतात.
4) *कोष*:--- या किडीचा कोष पांढरा असतो.ऑगस्ट ते मार्च या महिन्यात ती शेतात राहतात,कोषा भोवती मातीचे आवरण करून स्वसंरक्षण करते.कोषातून बाहेर पडलेले भुंगे 4 ते 5 महिने जमिनीतच सुप्त अवस्थेत राहतात.पहिल्या वळीवाच्या पावसानंतर बाहेर येतात.कडुनिंब,ब
ाभूळ,चिंच, बोर,शेवगा,गुलमोहर अश्या शेता भोवतीच्या झाडा झुडपावर गुजराण करतात.यांचा काळ 90 ते 110 दिवसांचा असतो.एका वर्षात हुमणीची एक पिढी पूर्ण होते.
*हुमणी अळीचे नियंत्रण*
--------------------------------
1) *जैविक नियंत्रण*
---------------------
1) मेटारायझियम व बिव्हेरिया एकरी प्रत्येकी 2 लिटर याप्रमाणे ड्रीप किंवा शेणखत,कंपोस्ट खातात मिसळून जमिनीला वापसा असतांना द्यावे.
2) निंबोळी पेंड,करंज पेंड,तंबाखू डस्ट तिन्ही एकत्र मिसळून एकरी प्रत्येकी 200 ते 250 किलो रासायनिक खत किंवा इतर खतांबरोबर द्यावे.
3) कीडग्रस्त क्षेत्रात एकरी 1 ते 1.25 लाख परोपजीवी ट्रायकोग्रामा सोडावेत.
2) *तांत्रिक नियंत्रण*
-------------------
प्रकाश सापळ्यांचा वापर करणे किंवा प्रकाश सापळे उपलब्ध नसल्यास प्लॅस्टिक घमेल्यात रासायनिक औषध व पाणी मिसळून त्यावर इलेक्ट्रिक बल्ब लावला असता रात्री हुमणी किडीचे भुंगेरे घमेल्यात जमा होऊन मरतात.ही उपाय योजना जून महिन्याचे सुरुवातीला केल्यास प्रौढ अवस्थेतील भुंगेरे मरतात व पुढील काळात हुमणी अळीचा होणारा त्रास आपोआप नियंत्रणात येतो.
3) *रासायनिक उपाय योजना*
-------------------------------
1) रिजेंट एकरी 10 किलो किंवा 8 किलो फरटेरा या रासायनिक औषधांचा वापर करावा.
2) क्लोरोपायरीफॉस (50 टक्के) अधिक सायपर मिथ्रीन (5 टक्के) (हामला ,कॅनॉन इ.) एकरी 2 लिटर याप्रमाणे ड्रीप अथवा ड्रेनचिंग करावे.
3) क्लोथ्रीडयानील (50 टक्के डब्लूडिजी) (डेंटासु) 150 ग्राम प्रति एकर वापरावे.
4) इमीडाक्लोपीड (40 टक्के) अधिक फिप्रोनील (40 टक्के) (लेसेंटा) 150 ग्राम प्रति एकर वापरावे.
5) जून,जुलै मध्ये एकरी 10 किलो क्विनॉलफॉस दाणेदार शेतात घालावे.
*हुमणी पासून ऊस व इतर पिकाचे दरवर्षी होणाऱ्या मोठे नुकसान टाळण्यासाठी वरील प्रमाणे उपाय योजना कराव्यात.हुमणी कीड नियंत्रणासाठी लागणारी सर्व माहिती कारखान्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी संबंधित गट ऑफिसला संपर्क साधावा.*
*श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. जुन्नर/आंबेगांव*

10/12/2017

शेतकरी राजा
*शेतकऱ्यांनी विजबीले भरु नये - शेतकरी संघटना*
*प्रेस नोट*
शेतकरी संघटनेने मुंबई उच्च न्यायलयात विजबीला संदर्भात याचिका क्र.८६५१/२०१० दाखल केली.याचिका सुनावणीनुसार शेतीपंपाचा व इतर विजपुरवठा खंडित करण्यापुर्वी विजकायदा कलम ५६ नुसार नोटीस देणे बंधनकारक आहे.त्याशिवाय विजपुरवठा खंडित करु नये असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.तसेच यापुर्वी २४ तासापैकी १६तासाचे विजबिलाचे अनुदान महाराष्ट्र शासनाने वितरण कंपनीस अदा केलेले आहे. उर्वरित ८तासाचे बिल शेतकऱ्यांनकडुन घेतले जायचे.परंतु त्या २४ तासापैकी कंपनीने फक्त ८तासच विज पुरवठा शेतकऱ्यांना दिल्याचे याचिकेत शेतकरी संघटनेने सिध्द करून दाखविले आहे.व त्यामुळे राज्य शासनाने दिलेले १६ तासाचे अनुदान रक्कम पैकी ८ तासाच्या बिलाची रक्कम वितरण कंपनीकडे जमा आहे ती रक्कम १२हजार कोटी रुपये असुन हि आगाऊ घेतलेली रक्कम जमा असल्याने शेतकरी विजवितरण कंपनीचं देणं लागत नाही तसेच शेतकऱ्यांचा विजपुरवठा खंडित करण्यासाठी कलम ५६ नुसार नोटीस देण्यात आली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपले मत मांडता आले नाही त्याकरिता शेतकरी संघटना सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतेकी महाराष्ट्र राज्य विद्युत कायदा २००३नुसार शेतकऱ्यांनी उपअभियंता महावितरण कार्यालय तालुका येथे प्रतितास पन्नास रुपये नुकसान भरपाई मिळवण्याकरिता लेखी स्वरुपात आपला ग्राहक क्रमांक टाकुन अर्ज करुन रितसर पोहोच पावती घ्यावी.प्रतितास नुकसान भरपाई ही अभियंता यांच्या पगारातुन वसुल केली जाते.कालचं जळगाव जामोद येथिल एका शेतकऱ्याने अश्याच प्रकारे लेखी अर्ज दाखल करुन सहालाख पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळवली आहे.त्यामुळे याप्रकारे सर्वानी अर्ज करावे त्यासाठी सर्व तोपरी लागणारी माहीतीची कागदपत्रे शेतकरी संघटना करेल त्यासाठी संपर्क शेख अजिमोद्दीन शेतकरी संघटना बीड जिल्हाध्यक्ष ९०४९६८९६९७ कालिदास आपेट शेतकरी संघटना कार्याध्यक्ष ९८२२०६१७९५ यांच्याशी संपर्क करुन माहीत घेऊ शकता.काही वितरण अधिकारी जाणुनबुजुन शेतकऱ्यांना त्रास देत असतील दम देत असतील तर त्यांना शेतकऱ्यांने आपले अस्त्र म्हणजेच आसुड त्या अधिकाऱ्यावर ओढावा. शेतकऱ्यांचा आसुड कायद्याने हत्यार नाही हे न्यायालयात सिध्द झाले आहे.तरि आता आसुडाने फोडण्याची वेळ आली आहे असे शेख अजिमोद्दीन यांनी सांगितले.तसेच विजबिलाची होळी १२ डिसेंबर रोजी शनिवारवाडा पुणे येथे करण्यात येणार असुन सर्वानी उपस्थित रहावे असे आव्हान शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केले आहे.
J. D. Jagtap Sarkar
Dalaj
Mo. 9860047882

06/11/2017

*Ujani Agro Farm Producer Company Limited*

Hello Everybody
We r having huge level of maize commodity , If u r intrested or any one hv contact of maize commodity Buyer/Exporter then contact us.

Mahadev Navale: 9975243171

J. D. Jagtap: 9860047882

Daya Pawar: 9960664474

Yogesh Kasabe: 9096344370

Suhas Randive: 9767848294

Shahaji Khartode: 8007990544

Email: [email protected]

निर्यातिचा कांदा उपलब्ध असल्यास सम्पर्क साधा सम्पर्क : 9860047882
13/10/2017

निर्यातिचा कांदा उपलब्ध असल्यास सम्पर्क साधा
सम्पर्क : 9860047882

दिनांक 7/10/2017आज *MACP पुणे* येथे MACP चे अधिकारी प्रशांत चासकर साहेब यांच्या मदतीने  WATER CONDITIONER कंपनी चे मालक ...
07/10/2017

दिनांक 7/10/2017
आज *MACP पुणे* येथे MACP चे अधिकारी प्रशांत चासकर साहेब यांच्या मदतीने WATER CONDITIONER कंपनी चे मालक व सहकारी आणि *उजनी अग्रो फार्म कंपनीचे संस्थापक व चेरमण जे. डी. जगताप* आणि संचालक महादेव नवले साहेब.
*पाण्यातील क्षार कमी करुण शेतितिल उत्पन्नात तसेच नफ्यात वाढ होईल व शेतकर्याना सर्वोत्तम प्रतींचे Customized WATER CONDITIONER कसे कमी किंमतीतले उपलब्ध होईल या विषयी चर्चा करताना.*

6 Oct 2017 दिवशी  *पनण मंडळ महाराष्ट्र राज्य. पुणे* येथे झालेल्या *उजनी अग्रो फार्म प्रोड्यूसर्स कंपनी लि*. च्या *कांदा ...
06/10/2017

6 Oct 2017
दिवशी *पनण मंडळ महाराष्ट्र राज्य. पुणे* येथे झालेल्या *उजनी अग्रो फार्म प्रोड्यूसर्स कंपनी लि*. च्या *कांदा निर्यात* विषया संदर्भात झालेल्या सभेला लाभलेले *युरोप निर्यातदार*, *पनण मंडळाचे* जेष्ठ आधिकारी व *उजनी अग्रो फार्म कंपनीचे संचालक मंडळ*

03/10/2017

संस्थापक :
चेरमण :
जयेश दत्तात्रय जगताप.
संचालक :
सीता जयेश जगताप.
महादेव विकास नवले.
अमर संजय जाधव.
सुनील शहाजी शिर्के.
अमोल बा. जगताप.
प्रवर्तक:
रुतुजा पांडुरंग जगताप.
दत्तात्रय अर्जुन जगताप.
संजय उत्तम जाधव.
शहाजी संजय खारतोडे.

Requirements of Pomegranate 200 MT Above 200 gm without any disease EXPORT Quality.If any farmers have Available More An...
21/08/2017

Requirements of Pomegranate 200 MT Above 200 gm without any disease EXPORT Quality.
If any farmers have Available

More Any Details.......

CONTACT US :
9860047882

[email protected]

UAFPC Ltd.

Address

Bhigwan, Pune Solapur Highway
Indapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ujani Agro Farm Producer Co. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share